संयुक्त राष्ट्रांमार्फत दरवर्षी ७ ऑक्टोबर रोजी 'जागतिक कापूस दिन (World Cotton Day)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे:
- आर्थिक विकास, आंतरराष्ट्रीय व्यापार तसेच गरिबी निर्मूलन यांमधील कापसाची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित करण्याच्या मुख्य उद्देशासाठी संयुक्त राष्ट्र हा दिवस साजरा करते.
- यंदा २०२६ साली या दिवसाची ६ वी आवृत्ती साजरी करण्यात येत आहे.
- २०२६ ची संकल्पना / थीम(Theme): 'हितकारक कापूस: व्यापार, परिवर्तन आणि भागीदारीद्वारे समृद्धीची निर्मिती (Cotton for Good: Building Prosperity Through Trade, Transformation and Partnership)' ही या दिवसाची २०२६ सालची थीम आहे.
दिवसाची पार्श्वभूमी:
- जागतिक कापूस दिनाची संकल्पना २०१९ मध्ये 'कॉटन फोर (C-4)' या देशांमार्फत मांडण्यात आली होती.
- 'कॉटन फोर' (C-4) देश अर्थात 'बेनिन, बुर्किना फासो, चाड आणि माली' या ४ देशांनी जागतिक व्यापार संघटनेला ७ ऑक्टोबर हा दिवस 'जागतिक कापूस दिन' म्हणून साजरा करण्यास मान्यता देण्याचे आवाहन केले होते.
- ऑगस्ट २०२१ मध्ये संयुक्त राष्ट्र आमसभेमार्फत ठराव मंजूर करत ७ ऑक्टोबरला अधिकृतपणे 'जागतिक कापूस दिन' म्हणून साजरा करण्याची घोषणा करण्यात आली होती.
- पहिला जागतिक कापूस दिन ७ ऑक्टोबर २०२१ रोजी साजरा करण्यात आला होता.